पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झाले मोठे बदल , जाणून घ्या आजचे नवीन दर

By Pramod

Published on:

Follow Us
petrol diesel rate today

नमस्कार मंडळी पेट्रोल आणि डिझेल हे इंधन सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. यामुळे दररोजच्या जीवनात होणाऱ्या खर्चाचा थेट परिणाम इंधनाच्या किमतींवर होतो. आज, ११ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. हे दर दररोज सकाळी सहा वाजता अपडेट केले जातात.

आज महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

अहमदनगरमध्ये पेट्रोलचा दर १०४.८९ रुपये आणि डिझेल ९१.४० रुपये आहे.
अकोला येथे पेट्रोल १०४.१८ रुपये तर डिझेल १०.७४ रुपये इतका आहे.
अमरावतीमध्ये पेट्रोल १०४.८८ रुपये आणि डिझेल ९१.४१ रुपये दराने उपलब्ध आहे.
औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर १०५.१८ रुपये तर डिझेल ९१.६८ रुपये आहे.
मुंबईत पेट्रोल १०३.५० रुपये आणि डिझेल ९०.०३ रुपये आहे.
नाशिकमध्ये पेट्रोलचा दर १०४.२६ रुपये असून डिझेलचा दर १११.७८ रुपये आहे.
नांदेड, लातूर, जालना, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या शहरांमध्ये पेट्रोलचा दर १०५.५० रुपये आणि डिझेलचा दर ९२.०३ रुपये आहे.
पुण्यात पेट्रोल १०४.५१ रुपये आणि डिझेल ९१.०३ रुपये दराने विकले जात आहे.
ठाणे जिल्ह्यात पेट्रोलचा दर १०३.७५ रुपये तर डिझेलचा दर ९०.२४ रुपये आहे.
सोलापूरमध्ये पेट्रोल १०४.२० रुपये आणि डिझेल ९०.७५ रुपये आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये होणारे हे बदल आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती, स्थानिक कर, वाहतूक खर्च आणि इतर विविध कारणांवर आधारित असतात. त्यामुळे दररोज त्यामध्ये थोडा फार बदल होऊ शकतो.

जर तुम्हाला तुमच्या शहरातील इंधन दर मोबाइलवरून जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही एसएमएसद्वारे ही माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइल (IOC) चे ग्राहक RSP आणि डीलर कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवू शकतात. एचपीसीएल (HPCL) चे ग्राहक HPPRICE आणि डीलर कोड 9222201122 या क्रमांकावर पाठवू शकतात. बीपीसीएल (BPCL) चे ग्राहक RSP आणि डीलर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून दर जाणून घेऊ शकतात.

Leave a Comment