मंडळी जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींनी मोठी उसळी घेतली आहे. मागील दोन दिवसांत दोन्ही धातूंच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली असून, त्यांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.
जळगावच्या बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दराने पुन्हा एकदा वाढ दर्शवली आहे. सध्या सोन्याचे दर (विना जीएसटी) 89,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत, तर चांदीचा दर 1,02,000 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. जीएसटीसह सोन्याचे दर 92,000 रुपये आणि चांदीचे दर 1,05,000 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. या किंमतींमुळे ग्राहकांमध्ये निराशा दिसून येत आहे, विशेषतः गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 89,164 रुपये, 23 कॅरेट 88,807 रुपये, आणि 22 कॅरेट सोने 81,674 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. याशिवाय, 18 कॅरेट सोने 66,873 रुपये आणि 14 कॅरेट सोने 52,161 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. चांदीचा दर 1,00,892 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
या वाढीमागील कारणांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, रशिया-युक्रेन युद्ध, डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरणात्मक निर्णय, आणि 2 एप्रिल रोजी यूएसएच्या सेलिब्रेशन दिवशी लागू होणारे टॅरिफ रेट्स यांचा समावेश आहे. या सर्व घटकांमुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे सराफा व्यापाऱ्यांचे मत आहे.
सोने आणि चांदीच्या दरांमध्ये अशा प्रकारची चढ-उतार कायम राहण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी योग्य संधी साधावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.