सोने खरेदीचा विचार करताय ? तर जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

By Pramod

Published on:

Follow Us
gold rate today

मंडळी सध्या देशभरात लग्नसराई सुरू आहे. अशा काळात अनेक लोक सोने आणि चांदी खरेदी करण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करतात. जर तुम्हीही त्याच विचारात असाल, तर आजची ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. सराफा बाजारातील किमती दररोज बदलत असतात, त्यामुळे आजचा दर जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

आज दिल्लीत चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा भाव १,०८,००० रुपये प्रति किलो इतका आहे.

सोन्याच्या किमतीकडे पाहिल्यास, आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,५५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २४ कॅरेट सोनं ९५,५१० रुपयांना विकले जात आहे. दिल्लीत २२ कॅरेटचे दर ८७,७०० रुपये आणि २४ कॅरेटचे दर ९५,६६० रुपये आहेत. बंगळुरूमध्ये २२ कॅरेटसाठी ८७,६०० रुपये तर २४ कॅरेटसाठी ९५,५६० रुपये इतका दर आहे. चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोनं ८७,७०० रुपये आणि २४ कॅरेट सोनं ९५,६६० रुपये दराने विकले जात आहे. हैदराबादमध्ये आज २२ कॅरेटसाठी ८७,५५० रुपये तर २४ कॅरेटसाठी ९५,५१० रुपये दर आहे.

सोन्याचे दोन मुख्य प्रकार असतात – २४ कॅरेट आणि २२ कॅरेट.

२४ कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध मानले जाते. यामध्ये ९९.९ टक्के शुद्धता असते आणि त्यात कोणतीही इतर धातू मिसळलेली नसते. हे प्रामुख्याने नाणी आणि बार बनवण्यासाठी वापरले जाते.

२२ कॅरेट सोने हे दागिन्यांसाठी उपयुक्त मानले जाते. यामध्ये २२ भाग शुद्ध सोने आणि २ भाग इतर धातू (जसे की चांदी, निकेल किंवा तांबे) मिसळलेले असतात. त्यामुळे ते अधिक मजबूत आणि टिकाऊ होते. २२ कॅरेट सोन्याची शुद्धता साधारणतः ९१.६७ टक्के असते.

Leave a Comment