मित्रांनो आजच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ३२२ रुपयांनी घसरून ९५,६८९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. चांदीचाही दर ११४० रुपयांनी घसरून ९६,०५० रुपये प्रति किलोवर आला आहे. जीएसटी समावेश केल्यास सोन्याचा दर ९८,५५९ रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदीचा दर ९८,७३१ रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
ही दरमाहिती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) कडून जाहीर करण्यात आली आहे. या दरांमध्ये जीएसटीचा समावेश नसतो. दर ज्या शहरात लागू आहेत, तिथल्या परिस्थितीनुसार साधारणपणे १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेए दररोज दोन वेळा, एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा सायंकाळी ५ वाजता हे दर प्रकाशित करते.
आज २३ कॅरेट सोन्याचा दर ३२१ रुपयांनी घसरून ९५,३०६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा सरासरी दर २९५ रुपयांनी घसरून ८७,६५१ रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. १८ कॅरेटचे दर २४१ रुपयांनी कमी होऊन ६९,६९० रुपये झाले आहेत. १४ कॅरेट सोन्याचा भाव १८८ रुपयांनी घटून ५५,९७८ रुपये इतका झाला आहे.
हे बदल दररोजच्या बाजारातील चढ-उतारांवर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आधारित असतात. त्यामुळे गुंतवणूक करताना किंवा दागिने खरेदी करताना या दरांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.