मंडळी आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठा बदल पाहायला मिळाला आहे. मागील दहा दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये सतत वाढ होत आहे आणि आज त्याने नवा उच्चांक गाठला आहे. काही दिवसांपूर्वी असा अंदाज वर्तवला गेला होता की लवकरच १० ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख रुपये पार करेल – आणि आज ही भविष्यवाणी खरी ठरली आहे.
१३ एप्रिल २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याची किंमत ९५६७ रुपये प्रति ग्रॅम होती. त्यानंतर १४ एप्रिलला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, सोन्याच्या किमतीत १६ रुपयांची घसरण झाली. १५ एप्रिलला दर आणखी ३३ रुपयांनी कमी झाले. मात्र १६ एप्रिलपासून पुन्हा वाढ सुरु झाली आणि त्या दिवशी सोनं ९६१७ रुपये प्रति ग्रॅम दराने विकले गेले. १७ एप्रिलला किंमत ९७३१ रुपये, तर १८ एप्रिलला ती ९७५८ रुपये प्रति ग्रॅम झाली. १९ आणि २० एप्रिल या दोन दिवसांत दर स्थिर राहिले.
२१ एप्रिलला सोन्याचा दर ९८३५ रुपयांवर पोहोचला. आजच्या दिवशी २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल ३०० रुपयांची, तर २२ कॅरेट सोन्यात २७५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत इतिहासात पहिल्यांदाच एक लाखाच्या वर गेली आहे.
महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सोन्याचे आजचे दर पुढीलप्रमाणे आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, आणि जळगाव या शहरांमध्ये २२ कॅरेट सोनं ९२,९०० रुपये, २४ कॅरेट सोनं १,०१,३५० रुपये आणि १८ कॅरेट सोनं ७६,०१० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे.
नाशिक, लातूर, वसई-विरार आणि भिवंडी या शहरांमध्ये २२ कॅरेट सोनं ९२,९३० रुपये, २४ कॅरेट सोनं १,०१,३८० रुपये आणि १८ कॅरेट सोनं ७६,०४० रुपये प्रति १० ग्रॅम दराने उपलब्ध आहे.
ही माहिती बाजारातील अपडेट स्थितीवर आधारित असून, स्थानिक सराफ बाजारानुसार किंमतीत थोडा फरक पडू शकतो.