ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण , जाणून घ्या सोन्याचे ताजे दर

By Pramod

Published on:

Follow Us
gold rate in marriage season

मित्रांनो आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आहे. लग्नसराईच्या तोंडावर ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरू शकते. आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९१,११५ रुपयांवरून ९०,३१० रुपयांवर आला असून त्यात ३५ रुपयांची घट झाली आहे.

चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून ती प्रति किलो २,९०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदीचा दर ९३,०५७ रुपये प्रति किलो आहे. २९ मार्चपासून केवळ चार दिवसांत चांदीच्या दरात एकूण ७,८७७ रुपयांची घसरण झाली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) जाहीर केलेल्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनं ८९,९४८ रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोनं ८२,६२४ रुपये, तर १८ कॅरेट सोनं ६७,७३३ रुपये प्रति १० ग्रॅम या दराने उपलब्ध आहे. या दरांमध्ये जीएसटीचा समावेश नाही. त्यामुळे तुमच्या शहरातील स्थानिक बाजारात यामध्ये १,००० ते २,००० रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेए दररोज दोनदा – एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता – हे दर जाहीर करते.

मार्च महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. १ एप्रिल रोजी सोनं ९१,११५ रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकावर पोहोचलं होतं. त्याआधी २८ मार्चला सोन्याचा दर ८९,३०६ रुपये, तर चांदीचा दर १,००,९३४ रुपये प्रति किलोवर गेला होता. २० मार्च रोजी सोनं ८८,७६४ रुपयांवर पोहोचलं होतं.

१९ आणि १८ मार्च रोजी अनुक्रमे ८८,६८० आणि ८८,३५४ रुपयांचे दर नोंदवले गेले. १७ मार्चला सोन्याने ८८,१०१ रुपयांचा विक्रम गाठत १३ मार्चचा उच्चांक मोडला होता. याच दिवशी चांदीही १,००,४०० रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती. १३ मार्च रोजी सोन्याने ८६,८४३ रुपयांचा दर गाठून १९ फेब्रुवारीचा विक्रम मोडीत काढला होता.

Leave a Comment