सोनं झालं लखपती ! सोन्याच्या भावात ऐतिहासिक उसळी , जाणून घ्या आजचे नवीन दर

By Pramod

Published on:

Follow Us
gold rate high about 1 lakh

मंडळी सोन्याच्या दराने बाजारात जबरदस्त उडी घेतली असून गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. सुरक्षित गुंतवणुकी चा सर्वोच्च पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्याचा दर आज थेट १ लाख रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अमेरिका-चीन व्यापार तणाव आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याच्या किमतीत अभूतपूर्व वाढ झाली आहे.

सध्याचा दर आणि भविष्यातील संभाव्यता

आज सकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ₹99,500 वर पोहोचला. त्यात जीएसटी धरला तर एका तोळ्यासाठी ग्राहकांना आता ₹१,००,००० पेक्षा अधिक रक्कम द्यावी लागणार आहे. अक्षय तृतीया अगदी जवळ आली असताना या वाढलेल्या दरामुळे त्या दिवशी आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे काही अर्थतज्ज्ञांच्या मते, वर्षाअखेरीसपर्यंत सोन्याचा दर ₹२ लाखांपर्यंत जाऊ शकतो. अशा वेळी सामान्यांसाठी सोनं खरेदी करणं हे खरंच स्वप्नवत बनत चाललं आहे.

सोनं एवढं महाग कसं झालं? दर ठरतो कसा?

सोन्याचा दर ठरवताना अनेक जागतिक आणि स्थानिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. हे दर दररोज बदलतात. खाली दिलेले मुख्य घटक दरांमध्ये चढ-उतार घडवतात.

1)आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती
लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (LBMA) मध्ये सोन्याचे दर ठरतात आणि ते दर जागतिक स्तरावर मान्य असतात. हे दर अमेरिकन डॉलरमध्ये ठरवले जातात.

2) डॉलरचे मूल्य
डॉलर मजबूत झाला की भारतात सोनं महाग पडतं, कारण आपण आयात करत असलेलं सोनं डॉलरमध्ये विकत घेतो.

3) मागणी आणि पुरवठा
सण, लग्नसराई किंवा जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याची मागणी वाढते, त्यामुळे दरातही वाढ होते.

4) सरकारी कर आणि शुल्क
भारत सरकार सोन्यावर १५% आयात शुल्क आणि ३% जीएसटी आकारते. त्यामुळे जागतिक दरात हे भर टाकूनच आपल्याकडील ग्राहक दर ठरतो.

5) रिझर्व्ह बँकेचे धोरण
रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात होणारे बदल आणि आर्थिक धोरणांचा अप्रत्यक्ष परिणामही सोन्याच्या दरांवर होता

सोनं नेहमीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखलं जातं. मात्र सध्याच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांसाठी ते दूरचं स्वप्न ठरत आहे. गुंतवणूकदारांनी काळजीपूर्वक विचार करून पुढील निर्णय घेणं गरजेचं ठरेल.

Leave a Comment