मित्रांनो सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून, नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरली आहे. काल दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत तब्बल 1,350 रुपयांची घट झाली आहे. यानंतर 22 कॅरेट सोन्याचा नवीन दर प्रति 10 ग्रॅम 93,000 रुपये इतका झाला आहे.
चांदी दरातही मोठी घसरण
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवली गेली आहे. मागील चार महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. चांदीच्या दरात तब्बल 5,000 रुपयांची घसरण झाली असून, सध्या चांदीचा दर प्रति किलो 95,000 रुपये इतका आहे.
या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या दरांवर झाला आहे.
गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक घडामोडींवर
सध्या गुंतवणूकदार जागतिक व्यापार धोरणे, संभाव्य आर्थिक मंदी आणि आंतरराष्ट्रीय बाजाराच्या घडामोडींवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे सोन्याची सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी घटली आहे. परिणामी, बाजारात सोन्याच्या दरांवर दबाव निर्माण झाला आहे.
जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात घसरण दिसून आली असून, ते 21.74 डॉलर्सने किंवा 0.70% नी कमी झाले आहेत.