मंडळी गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींनी उच्चांक गाठला होता. काही दिवसांपूर्वीच १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर तब्बल ९१ हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र आता या दरात घसरण होताना दिसत आहे. जागतिक आर्थिक अस्थैर्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील उलथापालथीमुळे ही घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ५० देशांवर लादलेल्या टॅरिफ वॉरचाही यावर परिणाम झाल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काळात सोन्याचा दर घसरून ५५ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकतो.
आजचा सोन्याचा दर (Gold Rate Today)
२४ कॅरेट सोनं
आज २४ कॅरेट सोन्याचा दर ९०,४४० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. कालचा दर ८९,७३० रुपये होता, म्हणजेच आज दरात ७१० रुपयांची वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोनं
२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ८२,९०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. काल तो ८२,२५० रुपये होता. यामध्ये ६५० रुपयांची वाढ झालेली आहे.
पुढील घसरणीचा अंदाज
इकॉनोमिक टाइम्सच्या अहवालानुसार, मॉर्निंग स्टार या अमेरिकन फायनान्शियल सल्लागार संस्थेचे तज्ज्ञ जॉन मिल्स यांनी येत्या काही वर्षांत सोन्याच्या किमतींमध्ये सुमारे ३८% घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार, भारतात सोन्याचा दर ५५,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली येऊ शकतो.