मंडळी गेल्या काही दिवसांत, सोन्याच्या किमतींनी एक विक्रमी पातळी गाठली होती. मात्र मंगळवारपासून ती किंमतींमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. केवळ काही तासांत एमसीएक्सवरील सोन्याचे दर 3,900 रुपयांनी कमी झाले. गुंतवणूकदारांनी नफा मिळवण्यासाठी विक्री सुरू केली असून, डॉलर इंडेक्सच्या वाढीमुळेही किमतींवर दबाव आला आहे.
त्यानंतर दिल्लीत मंगळवारी सोन्याचे दर 1 लाख रुपयांची पातळी ओलांडले, ज्यात जीएसटीचा समावेश नाही.
सोन्याच्या किंमतीत घसरण का झाली?
अमेरिका-चीनमधील तणाव कमी होण्याची शक्यता आणि अमेरिकन शेअर बाजारातील तेजीमुळे सेफ हेवन मानल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी घटली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत घट झाली. तसेच, फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीचे कोणतेही संकेत न दिल्यामुळे सोन्याच्या किमतींवर आणखी दबाव वाढला.
एमसीएक्सवरील ताज्या स्थितीचा आढावा
बुधवारी, एमसीएक्सवरील जून कॉन्ट्रॅक्टचा दर 95,457 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला, जो मंगळवारी 99,358 रुपयांवर होता. याचा अर्थ एकाच दिवसात 3,901 रुपयांची घसरण झाली आहे.
सोन्याचे भाव 55 हजारांवर येणार का?
मॉर्निंगस्टारच्या रिपोर्टनुसार, आगामी काही वर्षात सोन्याचे दर 55,000 रुपयांपर्यंत घसरू शकतात. जागतिक उत्पादनातील वाढ, सेंट्रल बँकांच्या खरेदीत घट, आणि रीसायकल्ड गोल्डचा पुरवठा वाढल्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये आणखी घसरण होऊ शकते.
विश्लेषकांचे मत
केडिया अँड डव्हायडारीचे अजय केडिया यांच्या मते, सध्या सोन्याची किंमत ओव्हरबॉट झोनमध्ये आहे, ज्यामुळे तांत्रिकदृष्ट्या उलटफेर होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांसाठी ही घसरण चिंतेचा विषय असली तरी, ती एक संधी म्हणूनही पाहिली जाऊ शकते. सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराच्या स्थितीचा आणि आगामी जागतिक घडामोडींचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे.
सोन्याच्या किंमतीतील या उतार-चढावामुळे गुंतवणूकदारांनी काळजीपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.