मित्रांनो मे महिन्याची सुरुवात चांगलीच झाली आहे. सुरुवातीलाच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल जाहीर केला आहे. विशेषता व्यावसायिक वापरासाठी असलेल्या १९ किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात घट झाली असून, ग्राहकांना आता हा सिलिंडर पूर्वीपेक्षा १४.५० रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.
घरगुती वापरासाठी असलेल्या १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. एप्रिल महिन्यात जशी किंमत होती, तीच किंमत मे महिन्यातही कायम आहे.
१ मेपासून दिल्लीत १९ किलो व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७४७.५० रुपये झाली आहे, जी एप्रिलमध्ये १७६२ रुपये होती. कोलकातामध्ये ही किंमत १८५१.५० रुपये झाली असून, यामध्ये सुमारे १७ रुपयांची कपात झाली आहे. मुंबईत सिलिंडर आता १६९९ रुपयांना मिळत असून, एप्रिलमध्ये त्याची किंमत १७१३.५० रुपये होती. चेन्नईमध्येही दर १९२१.५० वरून कमी होऊन १९०६.५० रुपये झाले आहेत.
म्हणजे गेल्या दोन महिन्यांमध्ये १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत एकूण ५५.५० रुपयांची घसरण झाली आहे. व्यवसायिक वापरासाठी ही सवलत नक्कीच उपयोगी ठरणार आहे, विशेषता हॉटेल, फूड इंडस्ट्री आणि लघुउद्योगांसाठी.
दुर्दैवाने, घरगुती गॅस वापरणाऱ्यांना अजूनही सवलतीची वाट पाहावी लागणार आहे. याविषयी सरकार किंवा इंधन कंपन्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
एलपीजी सिलिंडरच्या किमती दर महिन्याला बदलत असतात, त्यामुळे अशा अपडेट्सवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. तुमच्या शहरातील गॅस दर आणि तुमचा अनुभव आम्हाला नक्की कळवा.